वाघोली : आव्हाळवाडी तालुका हवेली येथील स्नेहालय संस्थेस ‘महात्मा राष्ट्रीय पुरस्कार’ प्राप्त झाला असून सर्वत्र स्नेहालय संस्थेचे कौतुक होत आहे.
पांडिचेरी चे राज्यपाल डॉ. किरण बेदी यांच्या हस्ते इंटरनॅशनल सेंटर दिल्ली येथे स्नेहालय संस्थेस पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार स्नेहालय चे संचालक फादर सनी जोसेफ यांनी स्वीकारला.
गेल्या पंचवीस वर्षापासून दिव्यांग मुलांना साठी करत असलेल्या कार्य व सामाजिक कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला.
यानिमित्ताने आव्हाळवाडी ग्रामस्थांच्या वतीने स्नेहालय संस्थेच्या संचालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच ललिता चंद्रकांत आव्हाळे, माजी सरपंच चंद्रकांत आव्हाळे, माजी उपसरपंच देविदास आव्हाळे, ग्रामपंचायत सदस्य शरद आव्हाळे आदी मान्यवर उपस्थित होते.