वाघोली – निनावी पत्राद्वारे शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या घटनेचा निषेध करण्यासाठी वाडेबोल्हाई, केसनंद ,पेरणेफाटा लोणीकंद पुणे-नगररोड येथे आंदोलन करत सर्वपक्षीय निषेध नोंदविण्यात आला.तसेच धमकी देणाऱ्या प्रवृत्तीला लवकरात लवकर अटक करून कठोर शासन करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन यावेळी पोलिस प्रशासनाला देण्यात आले.
यावेळी हवेलीच्या सभापती संजिवनीताई कापरे, योगेश शितोळे, वाडेबोल्हाईचे सरपंच दिपक गावडे, केसनंदचे माजी सरपंच चंद्रकांत सातव, केसनंदचे माजी सरपंच मिलिंदनाना हरगुडे, पेरणे सरपंच रुपेश ठोंबरे, राजेश वारघडे,शिवाजी भोरडे,संतोष गावडे, श्रीकांंत पाटोळे,विपुल गायकवाड,साईनाथ वाळके, सुरेखा भोरडे, लोचन शिवले, शोभा हरगुडे, शिरसवडीच्या सरपंच सिमा गावडे, अलका गावडे, संध्या भोर, सविता गावडे, रोहिणी पवार,सिता जाधव,सुखदेव गावडे, संतोष पायगुडे, मच्छिंद्र गावडे, नितीन नागवडे शंकरराव गायकवाड ,बापुसाहेब गायकवाड,संतोष नागवडे,सतिष नागवडे ,योगेश गायकवाड,याकुब मनियार, आदी मान्यवर उपस्थित होते.