नारायणगाव – जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील श्रीराम नागरी पतसंस्था जिल्हास्तरीय विघ्नहर्ता पुरस्काराची मानकरी ठरली आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन, सहायक निबंधक सहकारी पतसंस्था जुन्नर व जुन्नर तालुका पतसंस्था फेडरेशनच्या वतीने विघ्नहर्ता गणपती ट्रस्ट ओझर (ता. जुन्नर) येथे आयोजित पतसंस्थांच्या मेळाव्यात राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादीचे युवा नेते अमित बेनके, राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या हस्ते जिल्हास्तरीय विघ्नहर्ता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
यावेळी श्रीराम पतसंस्थेचे अध्यक्ष तानाजी डेरे, उपाध्यक्ष शशिकांत वाजगे, सुनील श्रीवत, राजश्री बेनके, विजया उनकुले, विजय घोगरे, अनिल थोरात, दयानंद डुंबरे, अनिल डेरे, यल्लू लोखंडे, ज्ञानेश्वर रासने, नवनाथ चौगुले, सीईओ मंगेश नलावडे, माऊली खराडे. वसुली विभागाचे बाळासाहेब सहाने, राहुल भोर, प्रवीण मनसुख. समीर पानसरे, शेखर भगत, अमोल औटी, सोनल भोर, पूजा बेनके उपस्थित होते. संस्थेला आजपर्यंत राज्य फेडरेशनच्या वतीने चार वेळा दीपस्तंभ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
संस्थेची आर्थिक परिस्थिती
ठेवी 206 कोटी, कर्ज 155 कोटी, सभासद 13 हजार, भाग भांडवल 9.25 कोटी, निधी 15.50 कोटी, गुंतवणूक 68 कोटी ,खेळते भांडवल 240 कोटी, नफा 1.80 कोटी