माजी आमदार गावडे : ओतूर येथे श्रीकृष्ण भूषण पुरस्काराचे वितरण
ओतूर – 1970 च्या दशकातील स्व. आमदार श्रीकृष्ण रामजी तांबे तथा झांबरशेठ यांचे कार्य नव्या पिढीला मार्गदर्शक आणि दिशादर्शक असल्याचे उद्गार शिरूर तालुक्याचे माजी आमदार पोपटराव गावडे यांनी काढले.
स्व. आमदार श्रीकृष्ण तांबे यांचा 50वा स्मृतिदिन आणि त्यानिमित्ताने दिला जाणारा श्रीकृष्ण भूषण पुरस्कार पोपटराव गावडे यांना प्रदान करण्यात आल्यानंतर सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. त्याचप्रमाणे जुन्नरच्या पहिल्या महिला आमदार स्व. लता नानी श्रीकृष्ण तांबे भूषण पुरस्कारनिर्मिती फाउंडेशन लोणावळाच्या संस्थापक आजीवन अध्यक्ष आणि पद्मावती नर्सिंग होमच्या डॉ. सीमा शिंदे-पानसरे यांना प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी ज्येष्ठ नेते अनंतराव चौगुले, शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार, “विघ्नहर’चे संचालक धनंजय डुंबरे, वासुदेव जोरी, सोपानराव भाकरे, संस्थेचे अध्यक्ष अनिल तांबे, प्रभाकर तांबे, राजेंद्र डुंबरे, रघुनाथ तांबे, पंकज घोलप, वैभव तांबे, सर्जेराव गाढवे, विलास दांगट, रंगनाथ घोलप रंगनाथ घोलप, राजेंद्र गावडे, सुनिता गावडे, मनीषा गावडे, बळीराम ढोमे आदी उपस्थित होते. दोन्ही मानपत्राचे वाचन आणि सूत्रसंचालन श्रीकृष्ण भूषण पुरस्कार समितीचे कार्यवाह भाऊसाहेब खाडे यांनी, सचिव प्रदीप गाढवे यांनी प्रास्ताविक तर सरपंच प्रशांत डुंबरे यांनी आभार मानले.
लता नानी या साधी राहणी; उच्च विचारसरणी असणाऱ्या महिला होत्या. विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर राहावे. प्रत्येकाने पाच झाडे लावली पाहिजेत आणि ती जतन केली पाहिजेत. पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे. तसेच प्रत्येकाने रोज व्यायाम करून आपल्या स्वतःच्या प्रगती बरोबर सामाजिक जबाबदारीचे भान सुद्धा ठेवले पाहिजे.
– डॉ. सीमा शिंदे-पानसरे, सत्कारमूर्ती