चिंबळी शाळा व्यवस्थापन सदस्यपदी निवड
चिंबळी – चिंबळी (ता. खेड) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीच्या ग्रामपंचायत प्रतिनिधी सदस्य निवडीमध्ये माजी उपसरपंच शिवाजी शरद कड यांनी अवघ्या एका मताने बाजी मारली.
चिंबळी ग्रामपंचायतचा वाद उच्च न्यायालयात प्रलंबित आहे, त्यामुळे गावात निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेमुळे ग्रामपंचायतीत प्रशासक कार्यरतरत आहेत, त्यात मध्यतंरी पार पडलेल्या चिंबळी विविध कार्यकारी सोसायटीमध्ये गावातील दोन्ही गट एकत्र आल्याचे चित्र निर्माण केले होते; परंतु परिस्थिती वेगळी आहे असे या निवडणुकीतून स्पष्ट झाले. वास्तविक पाहता ही निवड प्रक्रिया बिनविरोध होईल, अशी अपेक्षा असताना माजी उपसरपंच शिवाजी कड तसेच ग्रामपंचायत सदस्य काळूराम बनकर हे इच्छुक असल्याने निवडणूक लागली.
त्यात शिवाजी कड यांना 7 तर काळूराम बनकर यांना 6 मते मिळाली त्यामुळे शिवाजी कड यांची 1 मताने विजयी झाले. त्यानंतर कड यांचे सर्व सदस्याच्या वतीने अभिनंदन करण्यात आले तसेच ग्रामस्थांकडून शुभेच्छा देण्यात आल्या. माजगाव ग्रामस्थांच्या वतीने शिवाजी कड यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच चिंबळी ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला.
याप्रसंगी माजी उपसरपंच विश्वास बर्गे, माजी अध्यक्ष माऊली कड, उपसरपंच चेतनर बर्गे, ग्रामपंचायत सदस्य अनुराग जैद, गणेश काळूराम सोनवणे, महेश कड, वासुदेव जैद, अभिजित जगनाडे यांनी कड यांचा विशेष सत्कार केला.
शाळेचा विकास करण्यात येईल, तसेच गरजू विद्यार्थ्यांना विशेष सहकार्य करण्यात येईल .
– शिवाजी कड, नवनिर्वाचित सदस्य