तळेगाव ढमढेरे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने डिसेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या आर्थिक दुर्बल घटक (NMMS) शिष्यवृत्ती परीक्षेत तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील आर. बी. गुजर प्रशालेचे सहा विद्यार्थी पात्र ठरले आहेत.
त्यांना एकूण 60 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. सारथीसाठी बारा विद्यार्थी पात्र ठरले असून त्यांना एकूण 38 हजार 400 रुपये शिष्यवृत्ती मिळणार असल्याची माहिती प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुवर्णा चव्हाण यांनी दिली.
जितेंद्र जेधे गुण 137, सई ढमढेरे गुण 127, संस्कार भुजबळ 124, सोहम हिंगसे 120, अक्षय गायकवाड 101, श्लोक मलवडकर 114 तर सारथीसाठी पात्र विद्यार्थी विद्यार्थ्यामध्ये सानिका आदक, आरती बिडवे, दीक्षा ढोले, मानसी लवांडे, ओम मस्के, सर्वेश ढमढेरे, कार्तिक मुळे, कार्तिकी गुंड, पूजा खैरे, वैष्णवी मोरखंडे, तृप्ती चौधरी, तनवी दिवटे यांची निवड झाली आहे.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आर. जी. सातपुते व एन. आर. सातपुते यांनी केले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे उपमुख्याध्यापिका सुनीता पिंगळे, पर्यवेक्षक मोहन ओमासे, संस्थेचे अध्यक्ष कौस्तुभकुमार गुजर, उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते, सचिव अरविंद ढमढेरे, संचालक विजयराव ढमढेरे, विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे यांनी केले.