शिक्रापूर – सणसवाडी (ता. शिरुर) येथे मनोज जरांगे तसेच मराठा आरक्षणाला पाठींबा देत नुकतेच मराठा समाजाने मुख्य चौकात आज एक दिवसीय साखळी उपोषण सुरु केले.
नुकतेच गावामध्ये सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी करीत असल्याचे पोस्टर प्रसारित करुन राजकीय नेत्यांना एक इशारा देत मनोज जरांगे यांना पाठींबा मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.
यावेळी सरपंच सुवर्णा दरेकर, उपसरपंच दत्तात्रय हरगुडे, पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंडित दरेकर, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष वैभव यादव, माजी सरपंच सुरेश हरगुडे, माजी उपसरपंच नवनाथ हरगुडे ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र दरेकर,
माजी चेअरमन सुहास दरेकर ग्रामस्थ तसेच महिलांनी देखील आपला सहभाग नोंदवला आहे, सकल मराठा समाजाने साखळी उपोषण सुरु करत राजकीय नेत्यांना गावात प्रवेश बंदीचा इशारा दिला आहे.