अप्पर विशेष निबंधक शैलेश कोथमीरे : वेबसाइट अनावरण समारंभ
बारामती – पुणे जिल्ह्यात आदर्शवत, अशी समता नागरी पतसंस्थेची ख्याती आहे. पारदर्शी कारभार करीत संस्थेने प्रगतीचा आलेख उंचावला आहे. यापुढील काळातही संस्थेची यशस्वी घोडदौड सुरू राहील, असा विश्वास महाराष्ट्र राज्य सहकारी संस्थांचे अप्पर विशेष निबंधक शैलेश कोथमीरे यांनी व्यक्त केला.
पुणे येथे संस्थेच्या डिजिटल सेवेचा शुभारंभ झाला असून वेबसाइट अनावरण समारंभ सहकार आयुक्त कार्यालय पार पडला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास अप्पर निबंधक श्रीकृष्ण वाडेकर, उपनिबंधक मिलिंद सोबले, सहाय्यक निबंधक अ. रे. देवकाते, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप फरांदे, डॉ. प्रसन्न फरांदे, मुख्यव्यवस्थापक युवराज फरांदे, व्यवस्थापक राहुल ढोले व संचालक मंडळ उपस्थित होते.
संस्थेचे आर्थिक स्थिती
समता नागरी सहकारी संस्थेची नीरा येथे मुख्यालय असून बारामती, हडपसर, येथे शाखा आहेत. २०५ कोटींच्या ठेवी आहेत. १३९ कोटींचे कर्ज वाटप आहे.वसूल भाव भांडवल ३.५० कोटी एवढा आहे. निधी ४० कोटी तर राखीव निधी ७ कोटी आहे. बुडीत कर्ज निधी १६ कोटी आहे. एकूण व्यवसाय ३५० कोटी असून सीडी रेशो ६८ टक्के आहे. सीआरएआर : २७ टक्के, ठेव व्याजदर ८ टक्के एवढे आहे. तारणी कर्ज व्याजदर १३ टक्के, विनातारणी कर्ज व्याजदर १५ टक्के, सोने तारण कर्ज व्याजदर ९.५ टक्के, एनपीए प्रमाण ०.३७ टक्के, संस्थेची सभासद संख्या १७ हजार ८७५ इतकी आहे. संस्थेत ६३ कर्मचारी ६५ पिग्मी एजंट कार्यरत आहेत. १२ ते १४ कोटींची दैनिक ठेव आहे.
सामाजिक उपक्रम
संस्थेच्या वतीने व्याख्यानमालांची आयोजन केले जाते. आरोग्य शिबीर शिबिर भरवले जातात. पालखी सोहळ्या दरम्यान वारकऱ्यांना सेवा दिली जाते. संस्थेचे ग्रंथालय असून mpsc , upsc चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका उघडली आहे. सभासदांसाठी भव्य एस.सी हाँल व मंगल कार्यालयाची निर्मिती केली आहे. हाँल तसेच ३० रुमची सुविधा आहे. संत ज्ञानेश्वर महाराज उद्यान साकारले आहे.