पळसदेव – येथे सकल मराठा समाज्याच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी साखळी उपोषण सुरू आहे.
या उपोषण दरम्यान सातत्याने मराठा आंदोलनावर टीका करणे व मराठा समाजासाठी अंतरवाली सराटी येथे उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करणारे व मराठा समाज द्वेष ठेऊन विविध कारनामे करणारे गुणरत्न सदावर्ते यांचा पळसदेव येथे जाहीर निषेध करून त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.
त्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. यावेळी मराठा समाज आंदोलक मोठ्या संख्येने उपस्थित होते.