पिरंगुट : चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्यूनियर कॉलेजच्या पिरंगुट शाखेचे स्नेसंमेलन उत्साहात व जल्लोषात संपन्न झाले. कलाविष्कार – ढहश र्लीर्श्रीीींरश्र लरीपर्ळींरश्र या आधारावर स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.
बंटारा भवन येथे झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध किर्तनकार पंकज महाराज गावडे उपस्थित होते. उत्कृष्ट सादरीकरण, कार्यक्रमाची नियोजन बद्ध आखणी, शाळेच्या नावलौकिकाला साजेसे बंटारा भवन, निवडक आणि सरावपूर्ण इयत्ता निहाय गाणी, नाट्य हे या कलाविष्काराचे वैशिष्ट ठरले.
शेतकरी नृत्य, कृष्णलीला, महाराज सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माया गावडे, शिवाजीराव बुचडे, ललिता पवळे, योगेश मोकाटे, श्रद्धा प्रभुणे, दीपक करंजावणे, मोनाली ढोरे, प्रशांत नाहर, भरत बालवडकर, बंडू दातीर, पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल, संचालिका रेखा बांदल, यश बांदल, संदीप ढमढेरे, प्रदीप साठे, दिनेश कंधारे, मुख्याध्यापक अभिजीत टकले आदी मान्यवर उपस्थित होते.
पेरिविंकल पिरंगुट शाखेचे मुख्याध्यापक डॉ. अभिजीत टकले यांच्या मार्गदर्शनाखाली माध्यमिक विभागाच्या पर्यवेक्षिका पूनम पांढरे, प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका सना इनामदार, पर्यवेक्षिका पल्लवी नारखेडे यांच्याबरोबर सर्व शिक्षक वृंदांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन केले होते.
सूत्रसंचालन चुणचुणीत बालगोपालांनी केले. यामध्ये श्रवण पवळे, त्रिशा भामे, प्रणित गायकवाड या सूत्रसंचालकांच्या भाषाशैलीने उपस्थितांची मने जिंकून घेतली. प्रज्ञा हंद्राळे, संचिता केसकर शर्वरी कुदळे या विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांपैकी पल्लवी सपकाळ आणि अफिया शेख सूत्रसंचालन केले.