राजगुरूनगर – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या खेड तालुका महिला अध्यक्षा डॉ नीता आल्हाट यांची सहकार सेना पुणे जिल्हा संघटकपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.
पुणे जिल्हा सहकार क्षेत्रात पुढे आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना शासनाचा विविध योजना पोहचविण्यासाठी व योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी डॉ. नीता आल्हाट यांची सहकार सेनेच्या महिला जिल्हा संघटकपदी नियुक्ती झाली आहे.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने राज्याचे सहकार सेनेचे सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी डॉ. आल्हाट यांची नियुक्ती केली आहे. यासाठी महिला सरचिटणीस रिता गुप्ता यांनी शिफारस केली होती.
डॉ. नीता आल्हाट यांची शिरूर, खेड, आंबेगाव आणि जुन्नर या तालुक्यासाठी संघटकपदी ही निवड झाली आहे त्यांच्या निवडीबद्दल विविध पक्ष संघटना यांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.