मंचर -आंबेगाव तालुक्यात नव्याने 15 करोनाबाधित आढळले असून, एकूण संख्या 5 हजार 166 झाली आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी दिली.
मंचर येथे 4, अवसरी खुर्द येथे 2, अवसरी बुद्रुक, शिनोली, महाळुंगे पडवळ, भागडी, कळंबई, कडेवाडी, तळेकरवाडी, घोडेगाव, गावडेवाडी येथे प्रत्येकी एक असे बाधित आढळले आहेत.
आतापर्यंत तालुक्यात 121 रुग्णांचा मृत्यू तर 148 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आंबेगाव तालुका पंचायत समितीचे सभापती संजय गवारी यांनी दिली.