खासदारांच्या निलंबनाचा नोंदवला निषेध
वालचंदनगर – लोकसभेतील सुप्रिया सुळे व डॉ. अमोल कोल्हे या खासदारावरती निलंबनाची कारवाई केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बारामती इंदापूर राज्य मार्गावर लासुर्णे येथे रास्ता रोको करून या हुकूमशाही सरकारचा निषेध करण्यात आला.
सध्या लोकसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू या अधिवेशनामध्ये कांद्यावरील निर्यात बंदी तात्काळ उठवावी कारण या निर्यात बंदीमुळे शेतकर्यांवर मोठे संकट आले आहे.
तसेच अवकाळी पावसामुळे ज्या-ज्या शेतकर्यांचे नुकसान झाले आहे, त्या शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी या दोन-तीन विषयावरती चर्चा करण्यासाठी लोकसभेतील या खासदारांनी हा मुद्दा उचलून धरल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बारामती-इंदापूर राज्य मार्गावर लासर्णे येथे रास्ता रोको करून आंदोलन करण्यात आले. यावेळी इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष अॅड. तेजसिंह पाटील, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सागर मिसाळ, माजी पंचायत समिती सदस्य संजीव लोंढे, माजी ग्रामपंचायत सदस्य वैभव लोंढे, दिलीप लोहकरे, प्रद्युम्न खरात, दत्तात्रय पाटील, शिवाजी जगताप, वैभव जामदार, सोनू पाटील व हिमांशू पाटील आदी उपस्थित होते.