विमानांची केवळ सकाळी 8 ते रात्री 8 उड्डाणे

धावपट्टी दुरुस्तीसाठी वर्षभर रात्रीची विमान सेवा राहणार बंद

 

पुणे, – पुणे विमानतळावरील धावपट्टी दुरुस्तीसाठी येत्या 26 ऑक्‍टोबरपासून वर्षभर रात्री 8 ते सकाळी 8 या वेळेत उड्डाने बंद असणार आहेत. या कालावधीत रात्री होणाऱ्या विमान फेऱ्या दिवसा नियोजित करण्यात येणार आहेत.

लोहगाव येथील विमानतळाच्या धावपट्टीचे सप्टेंबरपासून दुरुस्तीचे काम होत आहे. याच पार्श्‍वभूमीवर हा बदल ऑक्‍टोबर 2021 पर्यंत असणार आहे. त्या अनुषंगाने केवळ सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेतच प्रवासी हवाई वाहतूक होणार आहे.

या कामामुळे रात्री होणाऱ्या उड्डाणांच्या वेळापत्रकाबाबत संभ्रम होता. सध्या हवाई दलाचा सराव होत नसल्याने, रात्रीच्या वेळी होणाऱ्या 26 विमानांची ये-जा सकाळी आठ ते रात्री आठ या वेळात करणे शक्‍य होणार आहे.

त्यामुळे या कालावधीतील कोणत्याही विमानाचे उड्डाण रद्द करणार नसल्याचे विमानतळाचे संचालक कुलदीप सिंग यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.