तळेगाव ढमढेरे : गणेश कापरे यांना नियुक्ती पत्र देताना मान्यवर.
तळेगाव ढमढेरे – तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील युवा उद्योजक गणेश कापरे यांची शिरूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (अजित पवार गट) खजिनदारपदी निवड करण्यात आली, अशी माहिती शिरूर तालुकाध्यक्ष रवींद्र काळे यांनी दिली. कापरे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन शिरूर तालुक्याच्या कार्यकारिणीत समाविष्ट करण्यात आल्याचे पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती यशवंत ढमढेरे यांनी निवडी दरम्यान सांगितले.
यावेळी शिरूर तालुका उपाध्यक्ष योगेश ढमढेरे, बाळकिसन भुजबळ, सुनील ढमढेरे, दुर्गेश भुजबळ, माजी चेअरमन संदीप ढमढेरे, संचालक बाळासाहेब ढमढेरे, माळी महासंघाचे महाराष्ट्र राज्याचे सचिव मुरलीधर भुजबळ, अरुणोदय पतसंस्थेचे चेअरमन कैलास नरके, भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष महेश भुजबळ, युवा उद्योजक बापूसाहेब भुजबळ, अमोल कापरे, तुकाराम गायकवाड, प्रकाश कापरे, बाळासाहेब तोडकर, लक्ष्मण नरके आदी मान्यवर उपस्थित होते. तालुक्यातील संघटना मजबूत भक्कम करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे गणेश कापरे यांनी निवडीनंतर सांगितले.