हभप पायगुडे ः मृदंग ताल साधना वारकरी गुरुकुलचा वर्धापन दिन सोहळा
पौड – मृदंग ताल साधना वारकरी गुरुकुल मुळशी आयोजित भव्य वर्धापन दिन सोहळा गुरुपूजन सोहळा तथा जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळा कुळे येथील श्रद्धा मंगल कार्यालय येथे संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि पखवाज पूजनाने झाली नंतर गुरुकुल मधील विद्यार्थ्यांचे सोलोवादान झाले याप्रसंगी गायन शेहनाई तबला आणि पखावज पं. सुरेश पत्की, पं प्रमोद गायकवाड श्री विनायक गुरव, श्री शुभम शिंदे यांचा एकत्रित वाद्य संगीत झाले यावेळी शुभम महाराज शिंदे यांनी आपले गुरुवर्ग विठ्ठल आबा गव्हाणे, श्रीहरी महाराज रेड्डी, हभप तुकाराम महाराज शिंदे, महेश शिंदे यांचा गुरुपूजन सोहळा पार पडला,
हभप संतोष पायगुडे यांची किर्तन रुपी सेवेत लोकांना जीवनातील वेळेचे महत्त्व तसेच गौरव सोहळा केल्यास काय होते याचे उत्तम उदाहरण देऊन कीर्तन सेवा केली यावेळी मृदंग वाद्यांचा संक्षिप्त अर्थ पटवून सांगितलं तर दुसर्याच्या जीवनाचा गौरव केल्यास आपला गौरव होतो, असा मोलाचा सल्ला सुद्धा दिला. समाजातील आदर्श व्यक्तिमत्व ज्येष्ठ कीर्तनकार हभप किसन भोईर, हभप शिवाजी हगवणे नंदूशेठ वाळंज, हभप दत्तात्रय साठे, सचिन केदारी, स्वप्नील सणस, संगीता ढाकूळ पुरस्काराने सर्वांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी नगरसेविका अल्पना वर्पे, स्वाती मोहोळ, शरद मोहोळ, राम गायकवाड, संतोष दगडे, रविकांत धुमाळ, महादेव कोंढरे, सचिन खैरे, अरुण मराठे, कोमल वाशिवले, चंदाताई केदारी, विनोद सुर्वे, सुनील मगर, ज्ञानेश्वर डफळ, नामदेव टेमघरे, शंकर साठे, गणेश मोढवे, यशवंत गायकवाड, मनोज साठे, दशरथ मानकर, हनुमंत शेलार, गणेश पारखी, निलेश केदारी, गुरुकुल चे विद्यार्थी पालक आणि पंचक्रोशीतील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश मारणे यांनी केले.