माळेगावात शिबिरास प्रतिसाद
माळेगाव – स्व. स्वरुप वाघमोडे यांनी केलेले सामाजिक कार्य जोपासण्यासाठी रक्तदान शिबीर आयोजित करुन त्यांच्या कार्याचा गुणगौरव होत आहे, असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
बारामती तालुक्यातील माळेगाव येथील बहुजन नेते स्व. स्वरुप वाघमोडे यांच्या तृतीय स्मरणार्थ रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी भरणे बोलत होते. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष ॲड. केशव जगताप, जिल्हा बँकेचे संचालक दत्तात्रय येळे, रणजित तावरे, संभाजी होळकर, कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजन तावरे, मनसे नेते ॲड. सुधीर पाटसकर, भाजपचे वासुदेव काळे, माजी सभापती संजय भोसले, धनवान वदक, माजी सरपंच दीपक तावरे, जयदीप तावरे, प्रमोद तावरे , सनी देवकाते व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी हडपसर पुणे येथील अक्षय ब्लड बँक यांच्या वतीने १५४ ब्लड पिशवी संकलन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन रिध्दी व सिध्दी स्वरूप वाघमोडे, शुभम वाघमोडे, सागर मोटे, दत्तात्रय मदने, योगेश वाघमोडे, महेश वाघमोडे, पोलिस पाटील सतीश शेंडगे यांनी केले.
शहिद दिन व स्व. अक्षय शिवाजी बनकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ युवा चेतना बारामती यांच्या वतीने माळेगावातील राजहंस संकुलात आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे संयोजक मनोज पवार व सागर बनकर यांनी सांगितले.