bollywood news | ‘पुष्पा: द रुल’ हा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाची मोठी चर्चा आहे. पुष्पा… पुष्पा… पुष्पराज. चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज सोशलवर ट्रेंड करत आहे.
‘पुष्पा : द राइज’ प्रमाणेच यावेळीही एक मोठे आयटम साँग असणार आहे. मात्र, यावेळी समंथा रुथ प्रभू यामध्ये नसल्याची चर्चा सुरु आहे.
रिपोर्टनुसार, चित्रपट रिलीज होण्याआधीच दिग्दर्शक सुकुमार काहीतरी मोठे प्लॅन करत आहे. चित्रपटातील एका आयटम नंबरसाठी प्लॅनिंग सुरू आहे. यासाठी अनेक अभिनेत्रींच्या नावाचा विचार केला जात होता. दरम्यान, निर्मात्यांनी ‘ॲनिमल’च्या भाभी 2 उर्फ तृप्ती डिमरीला आयटम नंबरसाठी लॉक केल्याची माहितीसमोर येत आहे.
‘पुष्पा 2’ मधील आयटम नंबरसाठी पूर्वीपेक्षा जास्त तयारी केली जात आहे. अशात आयटम नंबरसाठी तृप्ती डिमरीचे नाव फायनल करण्यात आले आहे. दरम्यान, देवी श्री प्रसाद यांनी आयटम नंबरसाठी एक अप्रतिम गाणे तयार केले आहे. हा चित्रपट १५ ऑगस्टला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
‘ॲनिमल’मध्ये भाभी 2 बनल्यानंतर तृप्ती डिमरीला रातोरात नॅशनल क्रशचा टॅग मिळाला. हा चित्रपट तिच्या करिअरसाठी धमाका ठरला. त्यानंतर तिला अनेक मोठे चित्रपट मिळाले. सध्या ती कार्तिक आर्यनसोबत ‘भूल भुलैया 3’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यानंतर ती त्याच्यासोबत एका रोमँटिक चित्रपटातही दिसणार आहे. या दोन प्रोजेक्ट्सशिवाय तृप्तीकडे राजकुमार राव आणि विकी कौशल यांच्यासोबत एक चित्रपटही आहे.
हे वाचाल का ? नताशा – हार्दिकच्या नात्यात दुरावा