ग्लोबल शेपर्स कम्युनिटी हबच्या माध्यमातून मासिक पाळीबाबत जनजागृती
कुरवली – मासिक पाळीविषयी जनजागृती होणे आवश्यक आहे कारण अनेक परंपरा, चाली रिती यामुळे याविषयी बोलणं टाळलं जातं. याचा परिणाम आरोग्यावर होण्याची शक्यता असते. शालेय जीवनात अशा संवेदनशील विषयावर मार्गदर्शन होणे नितांत गरजेच असल्याचे मत सिस्का ग्रुपच्या मॅनेजिंग डायरेक्टर ज्योत्स्ना उत्तमचंदानी यांनी व्यक्त केले.
कुरवली येथील शंकरराव पाटील माध्यमिक विद्यालयात ग्लोबल शेपर्स कम्युनिटी बारामती हबच्या माध्यमातून किशोवयीन मुलींची मासिक पाळीबाबत जनजागृती कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेचे उद् घाटन िउत्तमचंदानी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या मनीषा भाऊसाहेब जाधव, गावचे सरपंच राहुल चव्हाण, विद्यालयाचे मुख्याध्यापक गणेश घोरपडे, उपसरपंच मंदा चव्हाण, सदस्या पूजा खोमणे, पुष्पा माने, इ मान्यवर उपस्थित होते.
उत्तमचंदानी म्हणाल्या, अशा उपक्रमामध्ये सेवाभावी संस्था पुढे येत असून ग्लोबल शेपर्स कम्युनिटी बारामती हब मागील 2 वर्षापासून बारामती व इंदापूर तालुक्यात काम करत आहे. 4000पेक्षा जास्त शालेय मुलीना मार्गदर्शन व सॅनिटरी नॅपकिन्सच वाटप बारामती हब च्या माध्यमातुन करण्यात आल आहे.
विद्यालयातील 260 मुलीना सॅनिटरी नॅपकिन्स च वाटप करण्यात आले. उपक्रम यशस्वी करण्यासाठी हबच्या देवयानी पवार यांच्या मार्गर्शनाखाली तसेच शुभम ओसवाल, फातिमा खायमखनी, शंतनु जगताप, भरवी मुलमुले, माऊली खाडे, अखिल सूर्यवंशी, ओमकार कोकरे, ऋषिकेश नलावडे, हतीम आत्तरवला, खादिजा खायमखणी यांनी परिश्रम घेतले. कार्यशाळेसाठी कुरवली आरोग्य उपकेंद्र च्या डॉ. शुभांगी मारकड, आशा सेविका प्रतिभा माने, शालन पांढरे, स्वाती भोपळे तसेच पुणे जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी पुष्कराज निंबाळकर यांचे सहकार्य लाभले.
पाळीमुळे 70 टक्के मुली शाळेत गैरहजर
मनीषा जाधव म्हणाल्या, भारत देश स्वतंत्र होऊन 77 वर्षे झाली विज्ञानाने प्रगती केली पण या विज्ञानाला माणसाच्या मानसिकतेला बदलता आले नाही. आपल्या चालीरिती, परंपरा याला कारणीभूत आहेत. सुमारे 70 टक्के किशोरवयीन शाळकरी मुली मासिक पाळीच्या दरम्यान शाळेत गैरहजर असतात, अशी धक्कादायक बाब पुढे आली आहे. युनिसेफने महाराष्ट्रात केलेल्या एका पाहणीनुसार 11 ते 19 वयोगटातील केवळ 13 टक्के मुलींना पहिली पाळी येण्याअगोदर पाळीबाबत माहिती होती. या अहवालानेच शासनाची झोप उडविली आहे.