गावातून एकाचवेळी पाचशे हितचिंतक पोहोचले निवासस्थानी
शिक्रापूर – सणसवाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आमदार अशोक पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हजेरी लावत एकाच वेळी तब्बल पाचशे पदाधिकाऱ्यांनी आ. पवार यांच्या निवासस्थानी जात अनोख्या शुभेच्छा दिल्या.
आमदार अशोक पवार यांचे अभिष्टचिंतन करण्यासाठी सणसवाडीतून मोठ्या संख्येने ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ व कार्यकर्ते एकत्रित येऊन आमदार पवार यांच्या प्रेमाविषयी कृतियुकत उदाहरण समोर ठेवले आहे. यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडित दरेकर, सरपंच संगीता हरगुडे, उपसरपंच दत्तात्रय हरगुडे, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र दरेकर, अक्षय कानडे, माजी सरपंच सुनंदा दरेकर, स्नेहल भुजबळ, सदस्या रूपाली दरेकर, सुवर्णा दरेकर, शशिकला सातपुते, ललिता दरेकर, सुनिता दरेकर, उद्योजक हरिष येवले,
रामदास दरेकर, नवनाथ हरगुडे, संजय भंडारे, डॉ. पवन सोनवणे, डॉ. अजिंक्य तापकीर, संभाजी साठे, सुहास दरेकर, गोरक्ष भुजबळ, माजी चेअरमन बबुशा दरेकर, गोरख दरेकर, रमण दरेकर, रामभाऊ दरेकर, मच्छिंद्र दरेकर, प्रशांत दरेकर, सुभाष दरेकर, नवनाथ दरेकर, निलेश दरेकर, विष्णू हरगुडे, विठ्ठल दरेकर उपस्थित होते.
मंत्रिपदासाठी शुभेच्छा…
सणसवाडिकरांनी आमदार पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ, मंत्रालय, मंत्र्यांच्या लाल दिव्यांच्या गाड्या तसेच आमदारांचा फोटो असलेला अनोखा केक आणला. हा केक सर्वांच्या नजरेत भरला गेला.