मंचर – आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील निगडाळे, कोंढवळ आदी गावातील शाळा-महाविद्यालयांमध्ये ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
ग्रामपंचायत कार्यालयामध्ये उपसरपंच नितीन लोहकरे यांच्या हस्ते ध्वजपूजन व सरपंच सविता कोकाटे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. याप्रसंगी सदस्य सागर कोकाटे, सुरेखा लोहकरे, काळू कुऱ्हाडे, वनसमिती अध्यक्ष अनिता लोहकरे, ग्रामपंचायत कर्मचारी अंकुश लोहकरे उपस्थित होते.
निगडाळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ध्वजपूजन ज्येष्ठ नागरिक पांडुरंग कुऱ्हाडे, यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मुरलीधर कुऱ्हाडे व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष मारुती लोहकरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा अश्विनी लोहकरे, मुख्याध्यापिका शोभा जाधव, शिक्षक संतोष थोरात, शालेय विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स ड्रेसचे वाटप करण्यात आले. देशभक्तीपर भाषणातून आपली मनोगते व्यक्त केली. वनसमिती निगडाळे व ग्रामपंचायतीच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आले.