सासवड – सासवड (ता. पुरंदर) नगरीतील धान्य बाजारपेठेतील श्री कुंथुनाथ जैन मंदिरात जैन धर्मीयांच्या पर्युषणपर्वानिमित्त भव्य सजावट करण्यात आली होती. हे पर्युषण पर्व नुकतेच साजरे झाले. या दरम्यान उपवास तपस्या उत्साहात करण्यात आली. याबरोबरच दिगंबर जैन धर्माचे दहा दिवसांचे दशलक्षण पर्व भाद्रपद शुद्ध पंचमीपासून सुरू झाल्याचेही सांगण्यात आले.
जैन धर्मीयांच्या पर्युषणपर्वानिमित्त झालेल्या भगवान महावीर जन्म वाचनाचा लाभ यंदा बाबुशेठ कोठारी यांनी घेतला, तर भगवान महावीर स्वामी पाळणा लाभ विवेक पकाशेठ सोळंकी यांनी घेतला. नित्यदिनी पझालपूजा, स्नानपूजा तसेच भक्ती, अंगी विधीचा मान कुलदिप शर्मा व महिला मंडळाने घेतला.
संवत्सरी लाभ महेंद्र ओसवाल परिवाराने घेतला. पार्श्वनाथ भक्ती संगीत मंडळाचे कपिल रमेश ओसवाल, रोमित सोळंकी, हितेश सोळंकी आदींनी जैन धर्मीयांचे पर्युषणपर्वानिमित्त विविध कार्यक्रमात सहभाग घेतला. यानिमित्तानेच भगवान महावीर पुस्तक वाचनाचा लाभ विकासशेठ सोळंकी यांनी घेतला.
आठ उपवास तपस्या सुजल सोळंकी, प्रितम सोळंकी, सोनिया सोळंकी, पूर्वी कमलेश सोळंकी, रत्नराज सोळंकी यांनी केली. तीन उपवास तपस्या सीमा सोळंकी, मोनाल दिनेश सोळंकी, अंकित सोळंकी, हेमलता ओसवाल, वैशाली शहा, कमलेश ओसवाल आदींनी केली, अशी माहिती संघटनेतर्फे अशोक ओसवाल यांनी दिली.
दिगंबर जैन धर्माचे दहा दिवसांचे दशलक्षण पर्व भाद्रपद शुद्ध पंचमीपासून सुरू झाल्याचीही माहिती यानिमित्ताने वैभव खलसे, प्रशांत गिते, धनपाल पाटील यांनी दिली. हे पर्व भाद्रपद पौर्णिमेपर्यंत चालणार आहे.