वाघापूर – पुरंदर तालुक्याच्या पूर्वेस असणार्या आंबळे गावातील तीर्थस्थान म्हणून ओळखले जाणारे श्रीक्षेत्र ढवळेश्वर येथे जाणार्या रस्त्याला मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत 2019 मध्ये मान्यता मिळाली होती. त्यानंतर या रस्त्यावर खडीकरणाचे काम देखील झाले; परंतु मध्यंतरी करोनाच्या काळात हे काम बंद झाले. व वारंवार मुदतवाढ मिळाली व हे काम आता सुरू झाले आहे.
खडीकरण 2019मध्ये पूर्ण झाल्याने या रस्त्यावर सील कोट व डांबरीकरणाचा थर शिल्लक राहिला होता. आता सीलकोटचा थर या ठिकाणी सुरू केला आहे.
लवकरच डांबरीकरणही या ठिकाणी पूर्णत्वास जाईल. या रस्त्याचे काम सुरू झाल्याने आंबळे ग्रामस्थ आनंद व्यक्त करीत आहेत. या कामाची सुरुवात आंबळे गावचे माजी उपसरपंच सचिन दरेकर यांच्या हस्ते करण्यात आली. आंबळे गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
काही कारणास्तव रस्ता रखडला होता; परंतु आता रस्त्याचे थोड्याच दिवसात काम पूर्ण केले जाईल.
– प्रशांत पवार, शाखा अभियंता, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना