रहिमतपूर – भारतीय जनता पक्षाच्या रहिमतपूर मंडलाध्यक्षपदी जिल्हा परिषदेच्या कृषी समितीचे माजी सभापती भीमराव पाटील (काका) यांची, तर उपाध्यक्षपदी गणेश घोरपडे यांची निवड झाली आहे.
भाजपच्या रहिमतपूर मंडलातील नूतन सरचिटणीस, चिटणीस कोषाध्यक्ष व विविध मोर्चांच्या कार्यकारिणीतील पदाधिकारी व सदस्यांना प्रशस्तीपत्रे देण्यासाठी वाठार किरोली येथे उद्या, दि. 24 रोजी सकाळी 10 वाजता कार्यक्रम होणार आहे. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम आणि प्रभारी सागर शिवदास यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाला भाजपच्या पदाधिकार्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन भीमरावकाका युवा मंचच्यावतीने करण्यात आले आहे.