लाभार्थींनी व्हीके नंबर अपडेट करण्यासाठी सरपंचांचे आवाहन
मंचर – पोंदेवाडी (ता. आंबेगाव) तील शेतक-यांचे पीक नुकसान भरपाईची रक्कम शासनाकडून मंजूर झाली असली तरी नागरी सुविधा केंद्रात अनेक शेतकऱ्यांचे व्हीके नंबर अपडेट नसल्याने त्याच्या खात्यात पैसे जमा होत नाहीत., त्यासाठी व्हीके नंबर अपडेट करून शेतक-यांनी स्वतःच्या खात्यात पैसे जमा करून घ्यावेत, असे आवाहन सरपंच नीलम वाळुंज यांनी केले आहे.
पोंदेवाडी येथे 18 मार्च 2022 रोजी झालेल्या गारपीट व अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे करून शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईपोटी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे पोंदेवाडीला 13 लाख रुपये शासनाच्या वतीने आलेले आहेत;
परंतु लाभार्थींना हे पैसे प्राप्त होण्यासाठी व्हीके नंबर नागरी सुविधा केंद्रामध्ये जाऊन अपडेट करणे गरजेचे आहे, त्यामुळे हे पैसे बँकेत सोडता येत नाही,
त्यासाठी शेतक-यांना व्हीके नंबर अपडेट करण्यासाठी नागरी सुविधा केद्रामध्ये जावे, असे आवाहन उपसरपंच महेंद्र पांडुरंग पोखरकर यांनी केले आहे .