भोर – भोर पंचायत समितीच्या नेरे प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘आशा डे’निमित्त शुक्रवारी (दि. १) आशा सेविकांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी नेरे आरोग्य केंद्राअंतर्गत असलेल्या सहा उपकेंद्रातील ४० आशा सेविकांना उन्नती महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सीमा तनपुरे यांच्या हस्ते गुलाबपुष्प व भेट वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी अरुणा कुमकर, संध्या झगडे, मनीषा पडवळ, भाग्यश्री वर्टे, रेश्मा म्हस्के उपस्थित होत्या.
ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवासुविधांचा लाभ पोहोचवणाऱ्या आशा सेविकांच्या कामाचा, आशा दिनाचे निमित्ताने सन्मान करण्यात आल्याने उन्नती महिला प्रतिष्ठानचे आशा सेविकांनी आभार मानले.
यावेळी आशा गटप्रवर्तक, आशा सेविका तसेच नेरे आरोग्य केंद्रातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचलन संध्या झगडे यांनी केले.