तळेगाव ढमढेरे : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे एसबीआय बँक शिक्रापूर शाखेच्या वतीने गरजूंना साहित्यांचे वाटप करण्यात आले. तळेगाव ढमढेरे येथे गीताई विष्णू मंगल कार्यालयात एसबीआय बँकेच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला.
ज्ञानवर्धिनी विद्या मंदिराच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे स्मारक अंगणवाडी व ज्ञानवर्धिनी विद्यामंदिर तळेगाव ढमढेरे या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी नृत्याविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे स्मारक अंगणवाडी क्रमांक १ व विठ्ठलवाडी येथील अंगणवाडीसाठी खेळणी, एलसीडी टीव्ही, टॅब,किचन किट, फर्निचर आदी वस्तू आणि ५० महिलांना रोजगार मिळण्यासाठी शिलाई मशीन तर २५ दिव्यांगांना व्हीलचेअर वाटप करण्यात आले.
यावेळी एसबीआय बँकेचे पदाधिकारी ममता सिंह, संजू सिंह, सुमन यादव, ॠषी केशरवात्री, चेतना ढमढेरे, ज्योती पाटील, शिक्रापूर शाखेचे शाखा व्यवस्थापक अमोल नाफाडे आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन सारिका खेडकर यांनी केले.
बँकेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी राबवलेला उपक्रम कौतुकास्पद असून शिलाई मशीनमुळे महिला स्वतःचे कुटुंब चालवण्यास मदत होणार आहे.
-ममता सिंह