मंचर – कळंब (ता. आंबेगाव) येथील आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शाळा पूर्व तयारी इयत्ता पहिली प्रवेशोत्सव सोहळा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ४० पालकांनी आपल्या पाल्यांची नावे पहिलीसाठी नोंद केली. त्यापैकी पहिल्याच दिवशी १२ मुला, मुलींचा प्रवेशोत्सव सोहळा शाळेचे पदाधिकारी, शाळेतील शिक्षक ,ग्रामपंचायत पदाधिकारी आणि अंगणवाडी सेविका, मदतनीस व पालक विद्यार्थी यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आला, अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका सुनंदा भालेराव यांनी दिली आहे.
यावेळी कमलजादेवी विद्यालयाचे प्राचार्य सुनील टाव्हरे, केंद्रप्रमुख साहेबराव शिंदे यांनी उपस्थित मुलांना व पालकांना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमप्रसंगी मंचर बीट विस्तारधिकारी गजानन पुरी, कमलजादेवी विद्यालयाचे उपप्राचार्य भास्कर कांबळे, ग्रामपंचायत सदस्य कमलेश वर्पे, महेंद्र पारधी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य इसाक शेख, सोनल कहडणे, अंगणवाडी सेविका निर्मला कहडणे, अर्चना श्रीशेटे यांच्यासह मदतनीस,
पालक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम चोख व व्यवस्थित पार पाडण्या कामी शिक्षिका मीना निऱ्हाळी, गीतांजली शेलार, सुनिता चासकर, शिक्षक गणेश लोहकरे यांनी विशेष प्रयत्न केले. शिक्षक गणेश लोहकरे यांनी आभार मानले. यावेळी मुलांचा बुद्ध्यांक तपासण्यात आला.तसेच शारीरिक खेळही घेण्यात आले.
यामध्ये मुलांना विविध प्रकारच्या भाज्या, फळे, अक्षरे, असे विविध प्रकारची तोंड ओळख करून घेण्यात आली. मुलांकडून विकास पत्रामार्फत इयत्ता पहिलीची तयारी करून घेऊन जूनमध्ये शाळा प्रवेशोत्सव दुसरा मेळावा होणार आहे.