वाघोली : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच महाराष्ट्र केसरी पै.अभिजीत कटके यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बकोरी देवराई वनराई प्रकल्पात वृक्षारोपण करून वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
समजासेवक संपत गाडे यांनी १०० देशी झाडे याप्रसंगी दान केली. यावेळी समाजसेवक संपत गाडे, रघुनाथ गाडे यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी नियमित वृक्षसेवा करणारे वृक्ष मित्र धर्मराज बोत्रे, संदिप ढफळ, चंद्रकांत वारघडे यांचा सन्मान करण्यात आला.