टाकळीहाजी -कांदा निर्यातबंदीच्या निषेधार्थ शिरुर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस व शेतकरी संघटनेच्या वतीने केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करुन निषेध केला. पिंपरखेड, जांबूत (पंचतळे) येथून जाणाऱ्या बेल्हा -जेजुरी राज्यमार्गावर हे आंदोलन केले.
याप्रसंगी पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवकचे उपाध्यक्ष राजेंद्र गावडे, शिरुर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माऊली ढोमे, उपाध्यक्ष रखमा निचित, बाळासाहेब टाकळकर, बाबाजी वडने, सचिव रामदास वाजे, हिरामण बोऱ्हाडे, अशोक टाकळकर, भाऊ डेरे, शिवाजी कांदळकर, रामभाऊ सोदक, सौरभ पोकळे, देविदास पवार, म्हतारबा शेलार उपस्थित होते. यावेळी केंद्रसरकारच्या निषेधार्थ मोदी सरकार चले जाव, आदी घोषणा देण्यात आल्या.
कांदा निर्यातबंदी लवकरात लवकर उठवली नाही तर यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राजेंद्र गावडे यांनी यावेळी दिला आहे.