चीनमधील कोळसा खाण अपघातात 16 ठार

बीजिंग – चीनच्या नैऋत्येकडील चोन्गकिंग्‌ महापालिकेतील एका कोळसा खाणीमध्ये झालेल्या अपघातात 16 जण गाडले गेले. खाणीतील कार्बन मोनोक्‍साईड वायूच्या अतिरिक्‍त प्रमाणामुळे या सर्वांचा मृत्यू झाला, असे अधिकाऱ्यांनी माध्यमांना सांगितले.

खाणीतील ज्वालाग्रही पदार्थांमुळे मोठ्या प्रमाणावर कार्बन मोनोक्‍साईड वायूची निर्मिती झाली. या वायूचे प्रमाण सुरक्षिततेच्या प्रमाणापेक्षा खूपच जास्त होते. त्यामुळे 17 जण खाणीमध्येच अडकून पडले, असे शिन्हुआ या सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

खाणीत अडकलेल्या कामगारांच्या सुटकेसाठी 75 जणांचे बचाव पथक खाणीमध्ये उतरले असून 30 सदस्यांचे वैद्यकीय पथकही घटनास्थळी रवाना झाले आहे, असे या वृत्तामध्ये म्हटले आहे. खाणीतील केवळ एका व्यक्तीला जिवंत बाहेर काढण्यात यश आले असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

किजियांग जिल्ह्यातील सोनगझाओ येथील कोळशाच्या खाणीमध्ये ही दुर्घटना घडली. ही खाण एका स्थानिक ऊर्जा कंपनीच्या मालकीची आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.