मंचर – मंचर आणि लोणी (ता. आंबेगाव) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्वाधिक तरकारी आणि कांदा पुरवठा, विक्री करणारे आडतदार, शेतकऱ्यांचा सन्मान मान्यवराच्या हस्ते मंचर येथे करण्यात आल्याची माहिती सभापती वसंतराव भालेराव यांनी दिली.
शरद बॅंकेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, तालुका राष्ट्रवादी प्रमुख विष्णूकाका हिंगे पाटील, सभापती वसंतराव भालेराव, उपसभापती सचिन पानसरे, संचालक शिवाजीराव ढोबळे, रामचंद्र गावडे, संदीप थोरात, गणेश वायाळ, मयुरी भोर, रत्ना गाडे, जयसिंग थोरात, सखाराम गभाले, निलेश थोरात, सोमनाथ काळे, संदीप चपटे, अरुण बांगर, राजेद्र भंडारी, लक्ष्मण बाणखेले, सुनील खानदेशे, सचिव सचिन बोऱ्हाडे उपस्थित होते.
मंचर – कांदा पुरवठादार शेतकरी – प्रथम मंगेश जाधव (जाधववाडी), द्वितीय बजाबा ढोबळे (पारगाव शिंगवे), तृतीय प्रमोद कराळे (कारेगाव पेठ).
मंचर – तरकारी पुरवठादार शेतकरी – प्रथम विलास चव्हाण (निमगाव महाळुंगे), द्वितीय दत्तात्रय आवटे (महाळुंगे पडवळ), तृतीय पंकज भालेराव (नारायणगाव).
लोणी – कांदा पुरवठादार शेतकरी – प्रथम संतोष सुक्रे (खडकवाडी), द्वितीय बाळासाहेब बढेकर (धामण), तृतीय पांडुरंग वाळुंज (लोणी).
मंचर कांदा आडतदार – प्रथम मे. एस बी ट्रेडिंग कंपनी – संतोष पोखरकर, द्वितीय मे. टाव्हरे आणि कंपनी – शामराव टाव्हरे, तृतीय – मे. गोपाळकृष्ण ट्रेडर्स, किरण निघोट व चंद्रकांत थोरात. वसंतराव थोरात.
मंचर बटाटा आडतदार – प्रथम मे. भंडारी आणि कंपनी – राजेंद्र भंडारी, द्वितीय मे. युवराज ट्रेडर्स – नरेंद्र थोरात, तृतीय मे. सागर ट्रेडिंग कंपनी – ज्ञानेश्वर थोरात.
मंचर तरकारी आडतदार – प्रथम मे. पी. एस. पी व्हेजिटेबल कंपनी – भाऊसाहेब पोखरकर, द्वितीय मे. हेमंतकुमार व्हेजिटेबल कंपनी – हेमंत पोखरकर, तृतीय मे. झटका व्हेजिटेबल कंपनी – मंगेश शिंदे.
लोणी कांदा आडतदार – प्रथम मे. झुंबरशेठ लहानू वाळुंज अँड सन्स – महेंद्र वाळुंज, द्वितीय मे. शिवशंभो ट्रेडर्स – मच्छिंद्र वाळुंज, तृतीय मे. भैरवनाथ ट्रेडिंग कंपनी – नितीन नरवडे.