राजगुरूनगर – अंगणवाडी कर्मचार्यांच्या मागण्या शासनाने त्वरीत मान्य कराव्यात व खेड तालुक्यातील प्रकल्पाच्या अंगणवाडी कर्मचार्यांना देण्यात आलेली धमकी, या नोटिसची होळी करण्यासाठी तसेच 2021 पासुनचे थकित टी.ए.डी.ए.व आहाराचे थकीत पैसे त्वरित मिळावे. या मागणीसाठी खेड पंचायत समितीपुढे तालुक्यातील अंगणवाडी कर्मचारी महिलांनी गेली तीन दिवसांपासून धरणे आंदोलन सुरु केले आहे. शुक्रवारी (दि. 12) जेल भरो आंदोलन करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने दि. 16 नोव्हेंबर 2023 रोजी शासन व प्रशासनाच्या सर्व संबंधित कार्यालयांना
कर्मचार्यांच्या मागण्याचे निवेदन दिले होते; मात्र शासन स्तरावर याबाबत निर्णय झाला नाही. एकात्मिक बालविकास सेवा योजनेत वर्षेनुवर्षे काम करणारे अंगणवाडी कर्मचार्यांनी त्यांच्या वेतनात वाढ देण्यात तसेच सुप्रिम कोर्टाचा निर्णयनुसार मॅच्युईटीची रक्कम व पेन्शन देणे योजनेच्या कामासाठी मोबाइल देणे.
तसेच लाभार्थ्यांच्या दरात वाढ करणे या व इतर प्रश्न व मागण्या मान्य करण्यासाठी व थक्ति टी. ए.डी.ए. व आहाराचे थकित पैसे देण्यात यावेत या मागणीसाठी दि.4 डिसेंबर 12.2023 पासुनअंगणवाडी कर्मचारी संपावर गेल्या आहेत. दुसरीकडे संपावर असलेल्या महिलांना कामावरून कमी करण्याची नोटिस दिले आहे. परिणामी तालुक्यातील सर्व अंगणवाडी कर्मचार्यांमध्ये मोठा असंतोष पसरलेला आहे.