सातारा – उसने घेतलेले पैसे परत न दिल्याच्या रागातून सातारा पालिकेचा सफाई कर्मचारी सतीश मारुती जाधव (रा. माजगावकर माळ झोपडपट्टी, सातारा) याने गुरुवार परजावर मुकादम संतोष खुडे (वय 43, रा. ढोणे कॉलनी, रामाचा गोट) यांच्या डोक्यात फावडे घालून गंभीर जखमी केले. खुडे यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. ही घटना गुरुवारी सकाळी 7.30 च्या सुमारास घडली.
खुडे यांनी सतीश जाधव याच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. खुडे हे गुरुवार परज येथे सफाई कर्मचार्यांची हजेरी घेत होते. त्यावेळी सतीश जाधव तेथे आला. माझ्याकडून उसने घेतले साडेसात हजार रुपये परत दे, नाही तर तुला बघून घेईल, असा दम दिला. त्यानंतर दुसर्या कर्मचार्याच्या हातातील फावडे घेऊन खुडे यांच्या डोक्यात जोराने प्रहार केला. इतर सफाई कर्मचार्यांनी मध्यस्थी करून भांडण सोडवले.