15 पैकी 3 बिनविरोध तर 12 ग्रामपंचायतींसाठी रणधुमाळी
सासवड – पुरंदर तालुक्यातील 15 ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम सुरू आहे. अर्ज माघारी शेवटचा दिवस होता. यामध्ये वाल्हे सुकलवाडी आडाचीवाडी या ग्रामपंचायती बिनविरोध झाले असून उर्वरित 12 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यावेळी सरपंचपदासाठी थेट जनतेतून मतदान होणार आहे. 15 ग्रामपंचायतमधून सरपंच पदासाठी तब्बल 78 अर्ज प्राप्त झाले होते.
पुरंदर तालुक्यातील गुळुंचे, कर्नलवाडी, वाल्हे, वागदरवाडी, आडाचीवाडी, सुकलवाडी, वनपुरी, उदाचीवाडी, कोथळे, रानमळा, भोसलेवाडी, वीर, माळशिरस, राजुरी व एखतपुर-मुंजवडी या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होणार असून पोटनिवडणूक नायगावची जागा बिनविरोध झाली असून पानवडी, पांढे, राख, सुपे खुर्द, प्रत्येक एका जागेसाठी निवडणूक होणार आहे.
प्रा. दिगंबर दुर्गाडे यांनी वाल्हे, आडाचीवाडी, सुकलवाडी या ग्रामपंचायत बिनविरोध करण्यामध्ये वर्चस्व राखले आहे.
एखतपूर मुंजवडीच्या पाच जागा बिनविरोध तर सरपंचपदासाठी शीतल किरण टिळेकर व लक्ष्मी काळूराम धिवार यांच्यामध्ये निवडणूक होणार असून सदस्यांसाठी प्रभाग एक कोमल किरण गद्रे, रेश्मा बिलाल मुलाणी, सागर अशोक कुंभार, प्रभाग दोन सुदर्शन दत्तात्रेय भामे, विद्या हनुमंत झुरंगे, यांची बिनविरोध निवड झाली.
वागदरवाडीच्या सरपंचपदासाठी निवडणूक जाहीर झाली असून प्रभाग दोन छकुली अजित बर्गे, प्रभाग तीन संतोष मानसिंग पवार, सुनिता सचिन पवार, दिपाली अतुल पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. भोसलेवाडी ग्रामपंचायतीमध्ये तीन जागा बिनविरोध झाले असून प्रभाग दोन अहिल्या लक्ष्मण लवांडे, प्रभाग तीन शिवाजी महादेव भोसले, शीतल यशवंत भोसले, या तीन जागा बिनविरोध झाल्या असून सरपंच पदासाठी दुरंगी लढत होत आहे. कोथळे : मीना राजेंद्र जगताप, समीर दत्तात्रेय भांडवलकर, नेहा वैभव झगडे.
राजुरी ग्रामपंचायतमध्ये शीतल सचिन भगत, संतोष पांडुरंग भगत, दत्तात्रय शांताराम भगत, यांची बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवड झाली आहे. तर नायगावच्या असणाऱ्या पोटनिवडणुकीमध्ये बारीकराव नामदेव खेसे यांची तर पानवडीत प्रियंका गणेश भिसे, राख स्मिता दत्तात्रय रणवरे, बिनविरोध निवड झाली आहे. पुरंदर तालुक्यातील बहुचर्चित असणाऱ्या माळशिरस ग्रामपंचायतीची निवडणूक दुरंगी पद्धतीने होणार असल्याचे बुधवारी (दि. 26) स्पष्ट झाले.
बिनविरोध ग्रामपंचायती
वाल्हे : अतुल सोमनाथ गायकवाड. प्रभाग एक : तेजस बाळासो दुर्गाडे, मयुरी संदीप भुजबळ. प्रभाग दोन : समृद्धी सचिन लंबाते, अनिल राजाराम भुजबळ. प्रभाग तीन : अमित धनंजय पवार, पूर्वा राजेंद्र राऊत, कविता सतीश पवार. प्रभाग चार : सागर मदनराव भुजबळ, प्रमिला नवनाथ पवार, हरी प्रल्हाद दुबळे. प्रभाग पाच : शीतल दादा मदने, वैशाली दादासो पवार, अमोल शंकर पवार.
आडाचीवाडी : सुवर्णा बजरंग पवार. प्रभाग एक : शकुंतला महादेव पवार, सुजाता विजय पवार, विद्या मच्छिंद्र पवार. प्रभाग दोन : लता बाळू पवार, प्रतिभा राहुल पवार, विकास अशोक पवार. प्रभाग तीन : अलका दिलीप पवार, मोहन निवृत्ती पवार, ज्ञानदेव भाऊसो पवार.
सुकलवाडी : सरपंच : संदेश दिलीप पवार. प्रभाग एक : प्रतीक्षा भाऊसाहेब चव्हाण, योगेश मारुती पवार, उर्मिला दिलीप पवार. प्रभाग दोन : नितीन महादेव गावडे, हर्षदा नितीन पवार, वैजयंता दत्तात्रेय दाते. प्रभाग तीन : अमोल अरुण पवार, दत्तात्रेय लक्ष्मण पवार, अश्विनी कुंडलिक चव्हाण.