पुणे – केंद्रीय स्तरावर पोलीस विभागात खात्याअंतर्गत परीक्षेत (एमसीटीपी) देशात सर्वप्रथम आल्याबद्दल शहर पोलीस परिमंडल 1 चे उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे यांचा पुणे शहर मातंग एकता आंदोलन संघटनेच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात आला.
यावेळी संघटनेचे शहर अध्यक्ष विठ्ठल थोरात यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यांचे तीन खंड नारनवरे यांना भेट देण्यात आली. याप्रसंगी पुणे शहर मातंग एकता आंदोलनाचे महिला आघाडी प्रमुख सुरेखा खंडाळे, सचिव अरुण गायकवाड व इतर महिला पदाधिकारी उपस्थित होते. आमच्या समाजातील महिला पोलीस अधिकाऱ्याने देशात अव्वल क्रमांक मिळवल्याचा अभिमान आहे, असे विठ्ठल थोरात यांनी सांगितले.