पुणे – पाळीव प्राण्यावरुन दोन कुटूंबात तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये महिलांचाही समावेश होता. ही घटना लोहगाव येथील गुरुदास कॉलनीत घडली. याप्रकरणी विमाननगर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल झाला आहे.
पाळीव श्वान घरासमोर नैसर्गिक विधी करत असताना त्याला दगड मारल्याने दोन कुटूंबात जबर मारहाण झाली. जितेंद्र रामदर्शन तिवारी(55) यांनी दिलेल्या फिर्यादीनूसार दोघांना लाकडी बांबूने व हाताने मारहाण केली. तसेच फिर्यादीच्या पत्नीचा विनयभंग करुन खाली पाडून शिवीगाळ केली.
तर टिना जोसेफ(24) यांनी दिलेल्या फिर्यादीनूसार त्या श्वानाला घेऊन फिरायला गेल्या असता यातील आरोपीने त्याला दगड मारला. त्याचा जाब विचारला असता, फिर्यादी व तीच्या आईला शिवीगाळ करत मारहाण केली.