पुणे – माहिती अधिकार कार्यकर्ता रविंद्र बऱ्हाटे याला फरार असताना आळंदी येथील एका व्यक्तीने घरी आश्रय दिला होता. ती व्यक्ती बऱ्हाटेला अटक केल्यापासून मिळून येत नसल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान बऱ्हाटे याच्या पोलीस कोठडीत 20 जुलैपर्यंत वाढ करण्याचा आदेश विशेष मोक्का न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी दिला. दरम्यान फरार असताना बऱ्हाटे याने वापरलेली तीन वाहने आणि मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे.
पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने शुक्रवारी बऱ्हाटे न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी आश्रय दिलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी, या गुन्ह्यातील सह आरोपी विशाल ढेरे याच्याकडून या गुन्ह्यात सहभागी होण्यासाठी बऱ्हाटेने किती मोबदला घेतला.
अटक टाळण्यासाठी बऱ्हाटेला आणखी कोणी मदत केली? त्याला अन्न, वस्त्र, निवारा, पैसे, औषधे, वैद्यकीय उपचार, प्रवासाची साधणे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, आर्थिक मदत व साहाय्य कोणी व कशा प्रकार केले? ही मदत कोठून पुरविण्यात आली? याचा तपास करण्यासाठी बऱ्हाटेच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी विशेष सरकारी वकील ऍड. चव्हाण यांनी केली.