पुणे – केंद्र सरकारने डाळ साठा करण्यावर निर्बंध घातल्याच्या निषेधार्थ मार्केटयार्डातील गुळ-भुसार विभाग, नाना पेठ, भवानी पेठ, गणेश पेठ आणि रविवार पेठ येथील घाऊक व्यापाऱ्यांकडून शुक्रवारी (दि. 16) कडकडीत बंद पाळला.
त्यामुळे, या विभागात सकाळपासूनच गाड्या उतरून घेणे तसेच भरण्याचे काम ठप्प झाले होते. डाळींच्या उत्पादन हंगामात साठवणुकीवर मर्यादा आल्याने भाववाढ अटळ असल्याचे सांगत दि पूना मर्चंटस् चेंबरने, दि फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ ट्रेडर्स (महाराष्ट्र) आणि कॅटच्या (महाराष्ट्र) वतीने बंद पुकारला होता.