Pune Crime : सोसायटीतील दुचाकींची जाळपोळ करणारा अटकेत

पुणे – वादातून सोसायटीतील दुचाकींची जाळपोळ करणाºया एकास फरासखाना पोलिसांनी अटक केली. कसबा पेठ भागात ही घटना घडली. तौफिक रफिक शेख (वय २८, रा.अमन कॉम्प्लेक्स, कसबा पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. सलीम सय्यद (वय ४०, रा. कसबा पेठ) यांनी यासंदर्भात फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शेख आणि सय्यद यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. वादातून त्यांनी पहाटे चारच्या सुमारास सोसायटीच्या आवारात लावण्यात आलेल्या दुचाकींची जाळपोळ केली. शेख याच्यावर सोसायटीतील रहिवाशांनी संशय व्यक्त केला होता.

पोलिसांनी चौकशीसाठी शेखला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने दुचाकींची जाळपोळ केल्याची कबुली दिली. पोलीस उपनिरीक्षक आर. जी. लोखंडे तपास करत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.