पुणे – पीएमपी चालकाचा खून केल्याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकाने चौघांना अटक केली आहे. पुर्व वैमनस्यातून हा खून झाला असल्याचे तपासात उघड झाले आहे.
ऋषिकेश संजय बोरगावे (31, व्यवसाय- रिक्षाचालक, फुरसुंगी), अक्षय हनुमंत जाधव (21, व्यवसाय- नोकरी, फुरसुंगी) हे आंबिका लॉज, उमरगा येथे मिळून आले. प्रज्वल सचिन जाधव (20, रा. हडपसर ) तुषार सुर्यकांत जगताप (21, हडपसर) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार गौतम उर्फ अमोल मच्छिंद्र साळुखे (29) या पीएमपीएल चालकाचा दगडाने ठेचुन निघुन खुन करण्यात आला होता.
या गुन्हयाचा समांतर तपास करत असताना युनिट सहाचे पोलीस नाईक नितीन मुंढे, नितीन शिंदे, कानिफनाथ कारखेले, पोलीस शिपाई ऋषिकेश टिळेकर व शेखर काटे यांनी साळुंखे हा नोकरीवरुन सुटल्यानंतरचे त्याचे हडपसर भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासले व पोलीस नाईक प्रतिक लाहिगुडे यांनी टेक्नीकल ऍनालिसीस केले.
दरम्यान नितीन मुंढे यांना सदरचा गुन्हा हा ऋषिकेश बोरगावे व अक्षय जाधव यांनी केला असून ते उमरगा, जि. उस्मानाबाद येथे पळून गेल्याची खबर मिळाली. त्यानूसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश माने त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील यांनी उमरगा येथे जावून पूणे हैद्राबाद रस्त्यावरील लॉजेस तपासले असता आरोपी तेथे आढळून आले. त्यांना ताब्यात घेवुन पुढील तपासकामी त्यांना लोणी काळभोर पोलीस स्टेशन च्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश माने, सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे, प्रतिक लाहिगुडे, सचिन पवार, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे, सुहास तांबेकर, तांत्रिक विभागाचे सलीम तांबोळी व संदेश निकाळजे यांचे पथकाने केली आहे.
यातल मुख्य आरोपी ऋषीकेश याच्याबरोबर वाद झालेल्या व्यक्तीला मयत साळुखे हा जामिन राहिला होता. यातूनच आरोपींनी त्याला कामावरुन सुटल्यावर रस्त्यात गाठले. तेथे त्याला दारु पाजल्यानंतर त्याच्याशी वाद घालून त्याला खून करण्यात आला.