पुणे – वाहन चोरी करणाऱ्या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून सुमारे दिड लाखाच्या पाच दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. अभिषेक नागेश कांबळे (19, रा. उंब-या गणपती जवळ, भवानी स्विट मार्ट शेजारी, धायरी ) व पवन युवराज कांबळे ( 22, रा. व्हि. आय. टी. कॉलेजजवळ, बिबवेवाडी ) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
भारती विदयापीठ पोलीस स्टेशनच्या हददीत पोलीस उपनिरिक्षक नितीन शिंदे व तपास पथकातील पोलीस कर्मचारी असे वाहन चोरीस प्रतिबंध व्हावा म्हणून पेट्रोलिंग व वाहन चेकींग करीत होते.
दरम्यान तपास पथकातील पोलीस अंमलदार निलेश खोमणे व समिर बागसिराज यांना खबर मिळाली की, भारती विदयापीठ पोलीस स्टेशन हददीत वाहन चो-या करणारी मुले चोरलेल्या एका ऍक्सेस दुचाकीसह कात्रज कोंढवा रोड येथील कात्रज स्मशानभुमी समोर थांबलेली आहेत.
त्यानुसार स्टाफने कात्रज स्मशान भुमी येथे जावुन पाहणी करता ऍक्सेस गाडीवर असलेले दोघेजन गाडीसह पळुन जावु लागले होते. त्यांना स्टाफने गाडीसह पकडुन त्यांचे ताब्यात घेतले. त्यांचे ताब्यात मिळालेल्या ऍक्सेस गाडी बाबत तपास करता सदरची गाडी त्यांनी कात्रज येथील किनारा हॉटेल समोरुन चोरी केल्याचे निष्पन्न झाले.
त्यांच्या विरुध्द भारती विदयापीठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करुन, या गुन्हयात अटक करण्यात आली. त्यांच्याकडे केलेल्या तपासात वाहनचोरीचे आणखी काही गुन्हे केले आहेत का? याबाबत तपास करता आरोपी अभिषेक नागेश कांबळे याने यापूर्वी भारती विदयापीठ व वानवडी परिसरातुन वाहने चोरी केल्याचे कबुल केले.
चोरलेल्या दोन ऍक्टीव्हा, एक होंडा शाईन व एक डिओ गाडी अशा चार दुचाकी गाडया लपवलेले ठिकाण दाखवले. त्याच्याकडून चार गाडया जप्त केल्या. भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील एकुन चार गुन्हे व वानवडी पोलीस स्टेशनकडील 1 असे एकुन 5 वाहनचोरी गुन्हे नमुद आरोपीकडुन उघडकीस आणुन एकुन 1 लाख 50 रु. कि. च्या गाडया जप्त केल्या आहेत.
पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त सर्जेराव बाबर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक अर्जुन बोत्रे यांचे मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस उप निरीक्षक नितीन शिंदे, पोलीस अंमलदार रविन्द्र भोसले, अण्णासाहेब माडीवाले, निलेश खोमणे, संतोष भापकर, सोमनाथ सुतार, श्रिधर पाटील,राजु वेगरे, गणेश सुतार, सर्फराज देशमुख, समिर बागसिराज, सचिन पवार, प्रविण सपकाळ, हर्षल शिंदे, राहुल तांबे, अभिजीत जाधव, गणेश शेंड व विक्रम सावंत यांनी कारवाई केलेली आहे.