पुणे – कारला गाडी घासल्याचा जाब विचारल्याचा जाब विचारला म्हणून दाम्पत्यावर कोयत्याने वार करण्यात आले. ही घटना आंबेगाव बुद्रुक-जय शिवाजी मंडळ येथे घडली.
याप्रकरणी रितेश कोंढरे (रा.बिबवेवाडी) आणि त्याच्या दोन साथीदारांवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी 28 वर्षीय महिला असून त्या वकील आहेत. त्या पतीसह कारने चालल्या असताना, त्यांच्या कारला रितेश कोंढरे व त्यांच्या साथीदारांची गाडी घासून गेली.
फिर्यादीने त्यांना जाब विचारला असता, रितेश कोंढरेने त्यांच्या पतीवर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीने हा वार हाताने अडवला. यामध्ये त्या जखमी झाल्या. यानंतर त्यांना व पतीला आरोपींनी बॅटने मारहाण केली. त्यांच्या गाडीची काच फोडून नुकसान केले. यानंतर धमकी दिली. तपास सहायक पोलीस निरीक्षक आशीष कवठेकर करत आहेत.