पुणे – नामांकित हॉटेलमध्ये जेवणाच्या थाळीची एकावर एक फ्री ऑफर देऊन सायबर चोरट्याने एका व्यक्तीला तब्बल 1 लाख 1 हजार 722 रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी टिंगरेनगर येथील 46 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार विश्रांतवाडी पोलिसांनी सायबर चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात प्रसिद्ध असलेल्या एका हॉटेलमध्ये जेवणाच्या थाळीची एकावर एक फ्री अशी जाहिरात फिर्यादींच्या पत्नीला सोशल मीडियावर दिसली होती. त्यानुसार त्यांनी दिलेल्या लिंकवर क्लिक करून क्रेडिट कार्डची माहिती भरून दिली. त्यानंतर सायबर चोरट्याने फिर्यादींच्या पत्नीला फोन करून त्यांच्या मोबाइलवर एक लिंक पाठवून दिली. त्यांना ती लिंक क्लिक करण्यास भाग पाडून बॅंक खात्याची माहिती चोरून त्यांच्या खात्यातून रक्कम वळवून घेतली.