पुणे – आर्म ऍक्ट आणि मारहाणीच्या गुन्हयातील आरोपींना स्वारगेट पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. गुन्हा घडल्यापासून आरोपी ओळख लपवून फरार होते. नायल राजमाल ओसवाल (24 रा मार्केटयार्ड, पुणे), महेंद्र गंगाराम आहुजी ( 22 रा मार्केटयार्ड,पुणे), कुणाल राजेश मोरे (21 रा मार्केटयार्ड, पुणे), निखिल सदाशिव चव्हाण (23 रा मार्केटयार्ड ,पुणे) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, तपास पथकातील पोलीस शिपाई ज्ञाना बडे व मनोज भोकरे यांना खबर मिळाली की, स्वारगेट पोलीस ठाण्यात दाखल गुन्हयातील पाहिजे असलेले आरोपी
गुलटेकडी मार्केटयार्ड या ठिकाणी आले आहेत. त्यानूसार सापळा रचून त्यांस ताब्यात घेण्यात आले. दाखल गुन्ह्याबाबत अधिक चौकशी करता दाखल गुन्हा त्यांनी केल्याची कबुली दिली आहे.
आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्यांस न्यायालयात हजार करण्यात आले. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ करत आहेत. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर व पोलीस निरीक्षक (गुन्हे)सोमनाथ जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीशक अमोल रसाळ ,पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, पोलिस अंमलदार, धावरे, कांबळे साळवे, दळवी, ज्ञाना बडे, मनोज भोकरे, टिटमें, शेख, खेंदाड, गोडसे, वाबळे, यांच्या पथकाने कामगीरी केली आहे.