Pune Crime : ऐवज चोरी केल्याप्रकरणी 6 कामगारावर गुन्हा; महिलेला अटक

पुणे – घरातील चांदीची भांडी, एल.ई.डी टिव्ही असा 1 लाख 40 हजारांचा किंमती ऐवज चोरी केल्याच्या आरोपावरून सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा देखील समावेश आहे. त्यातील एका 35 वर्षीय महिलेला अटक करण्यात आली आहे. याबाबत सहकारनगर येथील एका 38 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. ही घटना 2 ते 3 ऑगस्ट या कालावधीत घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घरात काम करणार्‍या कामगारांपैकी कोणीतरी घऱाच्या मागील बाजूला असलेल्या लोखंडी स्लायडींगच्या दरवाज्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर 1 लाख रुपये किंमतीची चांदीची भांडी, 40 हजाराचा एलईडी टिव्ही, असा 1 लाख 40 हजारांचा किंमती ऐवज चोरी करून पळ काढला. तसेच फिर्यादींच्या जमीनीची व इतर महत्वाची कागदपत्रे देखील चोरी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.