पुणे – भारत सरकारचे कुसुम याेजने अंर्तगत अनुदान देण्याचे अमिष दाखवून पुण्यातील बाणेर परिसरात राहणाऱ्या ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरिक महिलेची ५७ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणुक करण्यात आली आहे. याप्रकरणी सुश्मिता रतन हलदर व सैफउद्दीन माेडल (रा.पाश्चिम बंगाल) या आराेपीं विराेधात चतु:श्रृंगी पाेलीस ठाण्यात आयटी अॅक्टनुसार आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविता गजानन दिवाण (वय-७२,रा.बाणेर,पुणे) यांनी पाेलीसांकडे फिर्याद दिली आहे. दिवाण यांनी गुगलवर भारत सरकारचे कुसुम याेजने बद्दल ऑनलाइन माहिती घेतली. कुसुम याेजना ऑनलाइन या वेबसाईटवरील एका मेल आयडीवरुन व दाेन अज्ञात माेबाईल क्रमांकावरुन त्यांना याेजना देण्याचे व त्याअंर्तगत अनुदान देण्याचे अमिष दाखविण्यात आले.
त्यानुसार दिवाण यांनी त्यांचे नातीच्या बँक खात्यावरुन ऑनलाइन पध्दतीने आराेपींचे एसबीआय बँक खात्यावर ५७ हजार रुपये भरले. मात्र, याेजनेचा काेणता फायदा न देता तसेच गुंतवलेले पैसे परत न करता आराेपींनी त्यांचे फाेन टाळत त्यांची फसवणुक केली. याबाबत चतु:श्रृंगी पाेलीस पुढील तपास करत आहे.