खडकवासला (पुणे) – मार्केटयार्ड पोलिस ठाण्यातून पोलिसांच्या पोलिस कोठडीतील मकोका गुन्हयातील सराईत गुन्हेगाराला टेंभुर्णी (सोलापूर) येथून पोलिसांनी अटक केली. संतोष बाळू पवार (वय २३, रा. खानापूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले की, पोलीस कोठडीतील फरार आरोपी संतोष पवार टेंभुर्णी (जि. सोलापूर) येथे असल्याची माहिती पोलिसांना सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी संतोष पवार यास ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत पुढील तपास मार्केटयार्ड पोलिस करत आहे.