पुणे – रविवार पेठेतील एटीएम फोडून 13 लाख 34 हजार रुपये लांबविणाऱ्याला फरासखाना पोलिसांनी चंदीगढ येथून अटक केली. सुरूवातीला पोलीस कोठडी, त्यानंतर न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. बचाव पक्षातर्फे ऍड. राहुल कांबळे, ऍड. बप्पाजी मासाळ आणि ऍड. सागर आरकड यांनी काम पाहिले.
10 ते 15 जुलै दरम्यान रविवार पेठ येथील फडके हौद चौकातील एटीएम गॅस कटर व रॉडच्या सहाय्याने फोडून रोखड पळवून नेण्यात आली. या प्रकरणातील आरोपी चंदीगढला असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी तेथे जाऊन कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक मंगेश जगताप, उपनिरीक्षक नीलेश मोकाशी, नाईक वैभव स्वामी आणि शिपाई संदीप कांबळे यांनी ही कारवाई केली.