पुणे – किरकोळ वादातून युवकावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना कात्रजमधील संतोषनगर भागात घडली. ॠषीकेश बरडे (वय 21, रा. संतोषनगर, कात्रज) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. बरडे आणि आरोपी ओळखीचे आहेत.
शनिवारी दुपारी आरोपी आणि बरडे मंडळाजवळ थांबले होते. किरकोळ कारणावरून त्यांच्यात वाद झाला. बरडे आणि त्याचा मित्र सोनू कांबळे दुपारी दोनच्या सुमारास दुचाकीवरून वाईला निघाले होते. आरोपींनी संतोषनगर परिसरात बरडेला अडवले. त्याच्यावर कोयत्याने वार करून वार आरोपी पसार झाले. गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक विजय पुराणिक तपास करत आहेत.